[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

देशात ६० तर महाराष्ट्रात ५३ टक्के मतदान – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी

आज (26 एप्रिल) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आधी 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार तृतीयपंथी आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र, तुलनेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कमी मतदानाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र- लोकसभेच्या आठ जागांवर निवडणूक, एकूण मतदान – संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51%
वर्धा – 56.66 %
अकोला -52.49 %
अमरावती – 54.50 %
बुलढाणा – 52.24%
हिंगोली – 52.03%
नांदेड – 52.47 %
परभणी -53.79 %
यवतमाळ – वाशिम -54.04 %
राजस्थान, केरळ, त्रिपुरा आणि मणिपूरच्या सर्व जागांवर मतदान
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने मतदान झालेल्या 50 टक्क्यांहून अधिक जागा काबीज केल्या आहेत. अशा स्थितीत सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी भाजपला आपल्या जागा वाचवाव्या लागणार आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीसाठी हा टप्पा लिटमस टेस्टपेक्षा कमी नाही. दुसऱ्या टप्प्यात आसाममधून 5, बिहारमधून 5, छत्तीसगडमधून 3, कर्नाटकातून 14, केरळमधून 20, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 8, राजस्थानमधून 13, उत्तर प्रदेशमधून 8, बंगालमधून 3, जम्मूमधून 1 आणि मणिपूर आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1 जागेवर मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासह राजस्थान, केरळ, त्रिपुरा आणि मणिपूरच्या सर्व जागांवर लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान
आसाम 71%
बिहार- 53%
छत्तीसगड- 72.13%
जम्मू-काश्मीर – 67.22%
कर्नाटक- 63.90%
केरळ- 63.97%
एमपी- 54.83%
महाराष्ट्र-53.51%
मणिपूर- 76.06%
राजस्थान 59.19%
त्रिपुरा- 77.53%
यूपी- 52.74%
पश्चिम बंगाल-71.84%
पहिल्या टप्प्यात इतक्या जागांवर मतदान
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात तामिळनाडू (39 जागा), यूपी (8), बिहार (4), मध्य प्रदेश (6), राजस्थान (12), आसाम (5), अरुणाचल प्रदेश (2), छत्तीसगड. (1), महाराष्ट्र (5), मणिपूर (2), मेघालय (2), मिझोराम (1), नागालँड (1), सिक्कीम (1), त्रिपुरा (1), उत्तराखंड (5), पश्चिम बंगाल (3) , अंदमान आणि निकोबार बेटे (1), जम्मू आणि काश्मीर (1), लक्षद्वीप (1) आणि पुद्दुचेरी (1) मधील 102 जागांवर मतदान झाले.

error: Content is protected !!