[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा

मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले
वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने  अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या मंदाकिनी यांनी एडवोकेट मोहन टेकावडे आणि स्वाती टेकावडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला त्यावरील सुनावणीनंतर न्यायमूर्ती नितीन साबरे यांनी मंदाकिनी यांना 21 डिसेंबर पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावयाचे झाल्यास 24 तासाचे आगाऊ नोटीस देण्याचे निर्देश सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिले होते. मंगळवारी हा अर्ज सुनावणीस आला असता ईडीतर्फे र्अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह युक्तिवाद मांडणार असल्याचे सांगून तहकुबी ची विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर न्यायमूर्ती साबरे यांनी पुढील सुनावणी नाताळ सुट्टीनंतर 12 जानेवारीला ठेवतानाच तोपर्यंत मंदाकिनी यांना अंतरिम संरक्षण कायम ठेवले.

error: Content is protected !!