[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा दिला आहे . त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचाही शोध घ्यायला हवा असे सांगितले राज्यपाल निष्पक्ष असावा राज्यात काही पेचप्रसंग आला तर त्याची सोडवणूक त्यांनी करविपण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटले आहेत त्यामुळे आता ते जे काही बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले .

error: Content is protected !!