[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा मुंबईच्या म्हाडा मध्ये जमीन घोटाळा -सोमय्या यांच्याकडून 8 बेकायदा स्टुडिओची पाहणी


मुंबई/ मालाड पश्चिमेचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा समुद्र किनाऱ्यावरील जमीन घोटाळा उघडकीस आला असून या ठिकाणी बांधलेल्या बेकायदेशीर 8 स्टुडिओच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी पाहणी करून कारवाईची मागणी केली आहे
सी आर झेड कायद्या नुसार समुद्रापासून 500 मीटरच्या अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही असे असताना सतेचा दुरुपयोग करून शेख यांनी हे बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप इथली जनता करीत आहे . म्हाडा – मार वे रोडवर असलेल्या भटी गावाजवळ 5 तर आक्सा येथे दोन आणि इतर ठिकाणी 1 असे एकूण 8 स्टुडिओ मातीचा भराव टाकून आणि कांदळवन ची कत्तल करून बांधले जात आहे.हे सर्व जिल्हाधिकारी आणि पालिकेच्या जागेवर असल्याने तत्काळ पर्यावरण खात्याने तत्काळ अस्लम शेखवर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी आणि किरीट सोमय्या व गोपाळ शेट्टींनी केली आहे .

error: Content is protected !!