[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राज ठाकरे घरी परतले


मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.
राजं ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया पार पडली तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पाच दिवसांनी राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मात्र त्यांना 2 महिने घरी आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे .त्यामुळे पुढील 2 महिने त्यांना सभा मेळावे पत्रकार परिषदा घेता येणार नाहीत दरम्यान आपल्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून ज्यांनी ज्यांनी इश्र्वरकडे प्रार्थना केली होम हवन केले त्या सर्वांचे राजने आभार मानले आहेत .

error: Content is protected !!