ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरा व दिराची कसून चौकशी सुरू! हागवण्याची राजकीय कारकीर्द संपली?


पुणे/राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत आहे. हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या सोबतच त्याचा मुलगा सुशील हगवणेला देखील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड बावधन पोलिसांनी ही कामगिरी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाला होता. त्याच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाला होता. त्याच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता सासरा आणि दीर देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हॉटेलमध्ये जेवताना हागवणे बाप बेट्याच्या मुसक्या आवळल्या
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार धरला जाणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे हे दोघेही गेल्या सात दिवसांपासून मोकाट फिरत होते. त्यांना आता अटक झाली असून ते मागील काही दिवसांपासून तळेगाव परिसरातच असल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून हे दोघेही हॉटेलमध्ये जेवण करत असताना या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.

error: Content is protected !!