[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पाकिस्तान विरुद्ध च्या कारवायासाठी भारत एकजूट – सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा


इस्लामाबाद/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ,जगभरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्याची भारतीय लष्कराकडून तयारी सुरू असतानाच, आमच्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसाक डार यांनी दिली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापले असून, कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज दिल्लीत सर्वदलीय बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारकडून जे जे प्रयत्न केले जातील त्याला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे समजते.
पहेलगाव मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाकिस्तानवर कारवाई करण्याबाबत पाठिंबा मिळत आहे. रशिया आणि अमेरिकेने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. तर आज इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहु यांनीही पंतप्रधान मोदींना फोन करून पाकिस्तान विरुद्ध जी कारवाई भारत करेल त्याला पाठिंबा असेल असे सांगितले. पहेलगाम हल्ल्या प्रकरणी जगभरातून भारताला पाठिंबा मिळत असल्याने पाकिस्तान मध्ये मोठी खळबळ माजली आहे. भारताकडून कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर मोठी लष्करी कारवाई होऊ शकते हे लक्षात आल्यामुळे, पाकिस्तानी सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच पाकिस्तानातील सर्व विमानतळांवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानने अतिरिक्त सैन्य आणून उभे केले आहे .त्यामुळे पाकिस्तान लढाईच्या पवित्र्यात आहे. त्यातच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इसाक डार यांनी सरळ सरळ धमकी दिली आहे .की जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही भारताला मुहतोड जबाब देऊ. तसेच काश्मीर च्या हक्कासाठी लढणाऱ्या सर्व मुजाहिद्दीनना म्हणजेच आतंकवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा आहे. आम्ही सर्व प्रकारची त्यांना मदत करीत राहू. असेही इसाक यांनी सांगितले. त्यामुळे आता भारत-पाक यांच्यात निर्णायक लढाईची शक्यता निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे भारताने जलसिंधू करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पाकिस्तानी जनतेमध्ये हाहाकार माजला आहे .याबाबत भारताची ही कारवाई अमानवी आहे असा कांगावा पाकिस्तान करीत आहे .तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधील एका कार्यक्रमात सांगितले की, पहेलगाम हल्ला हा आमच्या आत्म्यावर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याला दोषी असलेले दहशतवादी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपलेले असले, तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू. त्याचबरोबर या हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्या ही आम्ही सोडणार नाही असे मोदींनी सांगितल्यामुळे पाकिस्तान मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच हा हल्ला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्या इशारा वरून करण्यात आला अशी माहिती पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आदिल यांनी दिल्यामुळे, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा सबळ पुरावा भारताला मिळाला आहे.

error: Content is protected !!