[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

ड्रग प्रकरणात साक्षिदारांचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकरण दडपण्यासाठी २५ कोटींची डील


मुंबई/ क्रुझ वरील रेव्ह पार्टीत सापडलेल्या ड्रग प्रकरणात नवे नवे खूपसे होत असून वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू असतानाच काल या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साहिल याने सादर प्रकरण दबण्या साठी २५ कोटींची डील करण्याचा प्लॅन होता आणि त्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांनी मिळणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे .
साहिल याच्या गौप्यस्फोट नंतर एन सी बी मध्ये मोठी खळबळ माजली आणि एन सी बी ने सहीलचे सर्व आरोप फेटाळले त्यात असे काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले .इतकेच नाही तर साहिल जर खरे बोलत असेल तर त्याने ही माहिती न्यायालयाला द्यावी असा सल्लाही दिला .
एन सी बी चां रेड क्या वेळी हजार असलेला किरण गोसावी याचा साहिल हा बॉडी गार्ड आहे .त्याने प्रसार माध्यमांना सांगितले की रेड च्या वेळी मी क्ररझवार हजर होतो त्यावेळी एन सी बी ने माझ्याकडून ९ कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आरोपींना अटक करून एन सी बी च्या कार्यालयात नेल्यानंतर वेगवान हालचाली घडल्या .गोसावी आणि एन सी बी अधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या त्यानंतर स्याम नावाचा एक व्यक्ती आला . त्याच्या सोबत शाहरुखची मॅनेजर पूजा होती यावेळी मी आणि गोसावी कार मध्ये होतो गोसावी श्याम बरोबर फोनवर बोलताना मी एकले की २५ कोटींचा बॉण्ड टाका आणि १८ कोटींवर मांडवली करा यातील ८ कोटी समीर वानखेडे यांनी द्यायचे आणि उरलेले वाटून घ्यायचे असे बोलणे झाले . आर्यांच्या सुटकेसाठी ही डील होणार होती असे साहिल यांनी सांगितले मात्र त्याच्या या स्टेटमेंट मुले या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे . एन सी बी आता सहिलचे पत्र आपल्या संचालकांकडे पुढील कारवाईसाठी पाठवणार आहे .दरम्यान २ तारखेला रेड झाली मग साहिल इतके दिवस गप्प का असा सवाल केला तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले .फिल्म इंडस्ट्रीत दहशत मजवण्यासाठीच आर्यन वर कारवाई केली असा आरोपही मलिक यांनी केलाय

error: Content is protected !!