काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माओवाद्यांचे समर्थकगृहमंत्री अमित शहा यांचा खळबळ जनक आरोप
नवी दिल्ली/ काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी.सुदर्शन रेडी हे माओवाद्यांचे समर्थक आहेत असा खळबळ जनक आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उपाध्यक्ष उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर माओवादाचे ‘समर्थन’ केल्याचा गंभीर आरोप केला. जर त्यांनी ‘सलवा जुडूम’च्या विरोधात निकाल दिला नसता, तर देशातील माओवादी डाव्यांची चळवळ २०२०पूर्वीच संपुष्टात आली असती, असे ते म्हणाले.
मल्याळम मनोरमा समूहातर्फे शुक्रवारी आयोजित मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी शहा बोलत होते. काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची निवड केल्याने केरळमध्ये त्यांच्या विजयाची शक्यता कमी झाली आहे. डिसेंबर, २०११मध्ये रेड्डी यांनी माओवाद्यांविरुद्धच्या लढ्यात आदिवासी तरुणांचा, ‘कोया कमांडो’ वा, सलवा जुडूम किंवा इतर कोणत्याही नावाने, विशेष पोलिस अधिकारी म्हणून वापर करणे बेकायदा आणि असंवैधानिक आहे. तसेच त्यांना तातडीने नि:शस्त्र करावे, असे आदेशही दिले होते. याच निर्णयामुळे माओवाद रोखणे अशक्य झाले, असा आरोप शहा यांनी केला.
काँग्रेसने डाव्यांच्या दबावाखाली, एका अशा व्यक्तीची उमेदवारी जाहीर केली आहे, ज्यांनी माओवादाला पाठिंबा दिला आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र मंचाचा वापर केला, हे केरळचे नागरिक नक्कीच लक्षात घेतील, असेही शहा म्हणाले.
