पहेलगाव बदल्याची तयारी सुरू
नवी दिल्ली/ पहलगाम मध्ये २७ निरपराध पर्यटकांची धर्म आणि नाव विचारून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली जाणार आहे.पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सी सी एसच्या बैठकीत पाहलगाव हल्ल्याचा बदला घेण्याच्या योजनेवर चर्चा होऊन कारवाईबाबतचा मेगा प्लॅन तयार करण्यात आल्याचे समजते त्याच बरोबर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान्यांचा विजा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एन उन्हाळ्यात सिंधू जलमझौता रद्द करून पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळविण्यात आले आहे तर भारत / पाक सीमा असलेली आटारी बॉर्डर बंद करण्यात आलीय तसेच भारतातील पाकिस्तानी उच्च आयोगातल निम्म्या अधिकाऱ्यांची कपात करून ३० अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत. या प्रमुख निर्णय बरोबरच दहातवाद्यांवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे
मंगळवारी जम्मू काश्मिरच्या पहलगाम जवळील बेसरेन भागात ६ दहशतवाद्यांनी, पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळीबार केला होता .त्यात २४ हिंदू पर्यटकांसह २७ जणांचा मृत्यू झाला होता. तर५० पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले होते.मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा समावेश आहे .तसेच १६ एप्रिल रोजी लग्न झालेल्या अमित नरवाल या नौसेना अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जग हादरले होते.या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक पोलिस, लष्करी अधिकारी ,आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.भारत सरकारकडून या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख,जखमींना ५ लाख तर किरकोळ जखमींना 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.या घटनेतील बळी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह काल दिल्लीला आणण्यात आले .तिथून त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले. तिथे त्यांनी सी सी एस ची विशेष बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तीन मोठ्या पर्यायांवर चर्चा झाल्याचे समजते. तसेच सिंधू जल समझोता रद्द करण्यासह 3 मोठे निर्णय घेण्यात आले.शिवाय मोठी लष्करी कारवाई केली जाईल.त्यामुळे पुढील काही तासातच पहेलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाण्याची शक्यता आहे. सी सी एसीच्या बैठकीला पंतप्रधान मोदी,अमित शहा,संरक्षणमंत्री राजनाथ सिंह,परराष्ट्रमंत्री जयप्रकाश,अजित डोभाळ आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पहलगाम हल्ल्या नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ,रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासह सर्वच राष्ट्रांच्या प्रमुखांनी या हल्ल्याचा निषेध करून या प्रकरणी आम्ही भारताच्या पाठीशी असल्याचे सांगितले.पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याने त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहे.सायफुद्दीन खालिद हा या हल्ल्याचा मास्टर माईंड असून, टी आर एफ या दहशतवाद संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.तर या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या एकालाही आम्ही सोडणार नाही असे मोदी व अमित शहा यांनी सांगितले
दरम्यान या हल्ल्या नंतर भारतात संतापाची लाट उसळली असून ,देशभरातील लोकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तान विरुद्ध घोषणा दिल्या तसेच पाकिस्तानचे प्रतिकात्मक पुतळे जाळले .आता खूप झाले पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार मारा. अशा घोषणा लोक देत होते.त्यामुळे कारवाई बाबत मोठा दबाव असून पुढील काही तासात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
