ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अपक्ष आणि बंडखोरांना महायुती व महाविकास आघाडी कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू


मुंबई/महाराष्ट्र विधानसभेचां २८८जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. जवळपास ६६% मतदान झाले होते. शनिवारी या निवडणुकीचा निकाल आहे .परंतु एक्झिट पोल नुसार महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये काटे की टक्कर असल्याने दोन्हीकडच्या लोकांनी आता अपक्ष आणि बंडखोरांवर जाळे टाकायला सुरुवात केली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना सरकार स्थापन करायचे आहे .त्यासाठी संख्याबळाची जुळवा जुळव करण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे. गुरुवारी महाविकास आघाडीची एक बैठक झाली होती .या बैठकीत निवडणुकीच्या निकालानंतरचे रणनीती ठरवण्यात आली. त्याचबरोबर वर्षावर महायुतीच्या नेत्यांची ही बैठक झाली दोन्ही कडून निवडणुकी सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ मिळाले नाही तर अपक्ष आणि बंडखोरांना कशाप्रकारे संपर्क साधायचा आणि त्यांना आपल्या बाजूला कसे वळवायचे यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत .या निवडणुकीत दोन्हीकडचे मिळून ३५ बंडखोर निवडणुकीला उभे होते .त्यामुळे आतापासूनच या बंड खोराना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि दोन्हीकडच्या वरिष्ठ नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे .खास करून जे दोन्ही कडचे स्ट्रॉंग बंडखोर आहेत त्यांना संपर्क साधला जात आहे .अशा बंडखोरांना पुन्हा पक्षात घेऊन त्यांच्यावरची कारवाई रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे आज कोणाच्या बाजूने निकाल लागला हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल आणि त्यानंतर जर महायुती किंवा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले नाही तर मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू होईल या घोडेबाजारात बंडखोर आणि अपक्षांची जबरदस्त साधी होणार असल्याचे समजते.

error: Content is protected !!