ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डॉ. दीपक टिळक यांनी तारेवरची कसरत करीत आयुष्यभर कार्य केले ; लोकमान्यांच्या जयंतीदिनी लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६९ वी जयंती आज गिरगांव चौपाटीवर स्वराज्य भूमि या त्यांच्या समाधीस्थळी साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांची भूमिका साकार करणारे अभिनेते श्री प्रमोद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पडले. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री शशांक बर्वे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू कै डॉ दीपक जयंतराव टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
केसरीचे संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे दि १६ जुलै रोजी देहावसान झाले. शो मस्ट गो ऑन हे त्यांचे ब्रिद वाक्य होतं . अत्यंत शांत आणि सुशील व्यक्ती. असे असूनही घेतलेल्या निर्णयाचे ते खंबीरपणे पालन करीत. केसरीचे संपादकत्व आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पद सांभाळणे ही खरे तर तारेवरची कसरत होती. ते त्यांनी चिकाटीने सांभाळले. लोकमान्य टिळकांची भारतात अनेक स्मारके आहेत. त्यांचे जतन करायचे म्हणजे गाठी प्रचंड पैसा हवा. तो नसल्याने दीपकजींची तारांबळ उडत होती. निर्धाराच्या या कर्णधाराने लोकमान्य टिळकांचे जपलेले कार्य पुढील पिढीला सतत मार्गदर्शन करीत राहिल. पुणेकरांच्या मनात त्यांचे कार्य चिरंतन स्मरणात राहील, अशा शब्दांत लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे कै. दीपक टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. .

error: Content is protected !!