[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कल्याणमध्ये मराठी तरुणीवर बिहारी गुंडाचा हल्ला


कल्याण/ सध्या हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू आहे.मराठीचां आदर करा आणि मराठी माणसांशी व्यवस्थित वागा असा मनसेने परप्रांतियांना इशारा दिला आहे.असे असताना कल्याणच्या नांदीवली भागात, गोपाल झा नावाच्या बिहारी गुंडाने खाजगी रुग्णालयात घुसून तिथल्या मराठी तरुणीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक न झाल्यास त्याला आम्ही शोधून चोप देऊ असा इशारा मनसेने दिला आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
कल्याणमधील नांदीवली परिसरात एका खासगी रुग्णालय आहे.याच रुग्णालयातील बिहारी बिहारी गुंडाने रुग्णालयात घुसून मारहाण केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून यात रिसेप्शनिस्ट मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला करणा-याचे नाव गोपाल झा असल्याचे समजते.
गोपाल झा या मारहाण करणाऱ्या तरुणाला रिसेप्शनिस्ट तरुणीने इतकेच म्हटले होते की डॉक्टरांच्या केंबिसमध्ये एमआर बसले आहेत, तुम्ही जरा वेळ थांबा. त्यावरून या गोपाल झाने बेदम मारहाण केली. धावत येऊन त्याने रिसेप्शनिस्टवर उडी मारत यायाने जोरदार लात मारली. तसेच तिला खाली पाडत बेदम मारहाण केली. यावेळी उपस्थित लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
रुग्णलयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मानपाडा पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने पीडित मुलीच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली असून गोभीर दुखापत देखील झाली आहे. कल्याण पूर्व येथील पिसवालो येथील ही रहिवासी असून सोनाली प्रदीप कळासरे असे तिचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर एकाच संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण पूर्व येथील श्री बाल चिकित्सालय येथे ही पीडित रिसेपनिस्ट म्हणून काम करते.
डॉक्टरांच्या आदेशानुसार, डॉक्टरांच्या केबिनमध्ये (कन्सल्टिंग रूममध्ये) एमआर बसलेले असताना कोणालाही आत प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या नियमाचे पालन करत असताना, एक नशेच्या अवस्थेत असलेला तरुण कोणाचाही अडथळा न मानता थेट डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला. त्यावेळी त्याला थांबवून “आत जाऊ नका” असे सांगितल्यामुळे, संतप्त होऊन त्याने मला धावून येत तोंडावर लाथ मारली आणि जमिनीवर पाडले. त्यानंतर माझे कपडे फाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे.
हा प्रकार २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला. या प्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतरही संबंधित नशेखोर तरुण माझ्या राहत्या परिसरात वारंवार दिसून येत आहे, अशी माहिती सोनाली कळासारे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, आरोपीला तातडीने अटक करावी आणि पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी तिच्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी केली आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव या पीडित तरुणीची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!