ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला – तिसऱ्या महायुद्धाचे काउंटडाऊन सुरू


तेहरान/इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, आता अमेरिकेची एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अनुप्रकल्पांवर हल्ला करून जगात खळबळ माजवली आहे. त्यामुळे चिडलेल्या इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे .परिणामी जगात तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेची एन्ट्री म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी आहे अशी प्रतिक्रिया जगातील अनेक देशाने व्यक्त केली आहे.
इराणने आपले अनुकार्यक्रम थांबवावेत यासाठी अमेरिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. पण आमचा अनु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे असे इराणकडून सांगितले जात होते. पण अमेरिकेला ते मान्य नव्हते. दरम्यान काही दिवसांपूर्वी इराण आणि इस्त्राईल यांच्यात युद्ध सुरू झाले. या युद्धात अमेरिकेचा इस्त्राईलला पूर्ण पाठिंबा होता .तसेच अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार आज पहाटे अमेरिकेची बॉम्बर्स २ ही लढाऊ विमाने आकाशात झपावली. या विमानावर मोसेव्ह ऑर्डीनन्स ही बंकर बस्टर क्षेपणास्त्र होती. अमेरिकेच्या या बॉम्बर्स २ विमानांनी इराणच्या फोर्टओ, नतांज आणि इस्फहान या तीन अनुप्रकल्पांवर हल्ला केला. या हल्ल्यात २०० मीटर खोल बंकर मध्ये असलेले इराणचे तिन्ही अणुप्रकल्प उध्वस्त झाले.या हल्ल्यानंतर अमेरिकन विमाने सुरक्षित त्यांच्या तळावर परतली. स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही माहिती दिली.दरम्यान अमेरिकेच्या एंट्रीमुळे महायुद्धाची ठिणगी पडली असून, इराणला पाठिंबा देणाऱ्या रशिया चीन आणि काही इस्लामी राष्ट्रांनी अमेरिकेला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.तर दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायलची बाजू अधिक भक्कम झाली असून, इस्रायल आता अधिक ताकतीने इराणच्या सैनिकी तळांवर हल्ले करीत आहे .अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणला सर्व इस्लामी राष्ट्र साथ देऊन अमेरिकेच्या विरोधात युद्धात उतरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट
महायुद्ध सुरू झाल्यास भारत तटस्थ
इराण इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री झाल्यामुळे आता महायुद्धाची ठिणगी पडली आहे .कारण इराणला पाठिंबा देणारे रशिया आणि इतर इस्लामी देश अमेरिकेला धडा शिकवण्याची भाषा करीत आहेत. तर अमेरिकेसोबत असलेल्या नाटो देश कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यास आम्ही सिद्ध आहोत असे सांगत आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते .मात्र इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश भारताचे मित्र असल्यामुळे भारत या युद्धात तटस्थ भूमिका घेणार आहे.

error: Content is protected !!