[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

वांद्रयातील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेची कारवाई

मुंबई-ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आले
मिळालेल्या माहितीनुसार, हे कार्यालय जवळपास ४० वर्षे जुने आहे. तसेच वॉर्ड क्रमांक ९६ जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचे हे कार्यालय आहे. या शाखेचे शाखा प्रमुख फारूख शेख आहेत. दरम्यान जी शाखा पाडली जात आहे. ती खुप जुनी आहे. १९९५ च्या झोपड्यादेखील अधिकृत करण्यात आल्या आहेत. मात्र ४० वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच हे सर्व सुडबुद्धीने करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!