सदावर्तेच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न
जालना/जालन्यातील अंबड चौफुली येथे नियोजित अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवर दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आज जालन्यात आले होते. दरम्यान, शहरातील एका पेट्रोल पंपासमोर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. चार-पाच आंदोलकांनी गाडीच्या काचावर हाताने मारत सदावर्ते यांना विरोध दर्शवला. त्यानंतरही सदावर्ते यांनी धनगरांना एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली.यावेळी केलेल्या भाषणात सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत, धनगर समाजाच्या मागण्या कशा योग्य आहेत? हे सांगीतले. धनगर आरक्षण मिळालंच पाहिजे, यळकोट यळकोट जय मल्हार! माँ अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, अशा घोषणा देत आपण ‘डंके की चोटपर’ बोलणारच म्हणत धनगर भावांना एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचे कौतुक केले. आंदोलनं अनेक होतात, पण चर्चा नियतीत खोट नसते त्या आंदोलनाचीच होते.आपण कायद्यावर बोलतो, अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, भारतीय संविधानाचे विचार सारखेच आहेत. आता येताना गाडीवर काही लोक आले, माझी ८० वर्षाची आई तुमच्या भेटीला आली आहे. भावांनो, मला तुम्हाला सागायंचय, आपण संविधानाला जोडलेले आहोत, हम धनगर है. नागेवाडीच्या पुढे आलो तेव्हा, मी रस्त्याने मेढ्यां चारायला जाणारं कुटुंब माझ्या पाच वर्षाच्या मुलीला दाखवलं. आम्ही आदिवासी आहोत, त्याचा हा पुरावा आहे. सरकार माझ ऐकतं, अनेकांना माझं ऐकावंच लागतं, असही सदावर्ते म्हणाले.
