ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस


मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यादी राहुल गांधींना दिला आहे
काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी परदेशात जाऊन महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली होती ते म्हणाले होते की महाराष्ट्रात तरुणांनी मोठ्या संख्येने मतदान केले अगदी साडेसात वाजेपर्यंत मतदान झाले पण निवडणूक आयोगाने केवळ साडेपाच वाजता पर्यंत आकडेवारी आम्हाला दिली ही एक प्रकारे फसवणूक आहे असा आरोप राहुल गांधींनी केला होता त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत शब्दात टीका करताना राहुल गांधींचा पक्ष महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीमध्येही हरला आहे सर्वच ठिकाणी मतदानाबाबत राहुल गांधी कशी काय शंका घेऊ शकतात त्यांनी काँग्रेसचा पराभव मान्य करावा आणि लोकांमध्ये जाऊन काम करावे तेच त्यांच्या हिताचे आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

error: Content is protected !!