[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

मेट्रो बनली शाकाहारी मटण मच्छी नेण्यास बंदी

मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक ट्रान्सपोर्ट असल्याने मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी घालत येणार नाही आणि अशी बंदी घातली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले तर ही बंदी टिकणार नाही कारण लोकशाहीत कोणी काय खायचे आणि कशातून काय न्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या बंदीचा आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकेल कदाचित मांसाहारी लोक मेट्रो वर बंदीही घालतील

error: Content is protected !!