[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात चहापान कार्यक्रम

मुंबई, दि. २१ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन- २०२१च्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ सदस्यांसमवेत चहापानाचा कार्यक्रम झाला.  तत्पूर्वी अतिथीगृहातील समिती कक्षात विधिमंडळ सदस्य शेकापचे जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रारंभी स्वागत केले.
चहापान कार्यक्रमात मंत्रीमंडळातील सदस्य सर्वश्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील,  अशोक चव्हाण, सुभाष देसाई, दादाजी भुसे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील,  गुलाबराव पाटील,आदित्य ठाकरे,अस्लम शेख, उदय सामंत, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री शंभूराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!