[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सैफवार हल्ला करणारा शहजाद बांगला देशातील कुस्ती पट्टू – सैफवरील हल्ल्याची दिली कबुली


मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. आता पोलिसांच्या चौकशीत शहजादने काही खुलासे केले आहेत. त्याने पोलिसांना सांगितलं की तो बांगलादेशमध्ये कुस्तीपटू होता आणि कमी वजनीगटातत तो कुस्ती खेळायचा. विशेष म्हणजे शहजाद हा राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होता आणि याचमुळे तो अत्यंत शिताफीने सैफवर हल्ला करून तिथून निसटूही शकला. मात्र बांगलादेशमध्ये बेरोजगार असल्याने तो भारतात आला होता.आरोपीने दिलेल्या माहितीनुसार तो काही दिवसांपूर्वी वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये काम करू लागला होता. शिफ्ट संपल्यानंतर तो या परिसरात पायी चालायचा. अशातच एकेदिवशी तो सैफच्या घराजवळ पोहोचला होता. सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताच सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नसल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. तो पार्किंग एरियाच्या रस्त्याने फायर एग्झिटजवळ पोहोचला आणि तिथून तो जिने चढून अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचला. तिथे गेल्यानंतर तो डक्ट एरियाद्वारे थेट सैफ अली खानच्या मुलाच्या खोलीतील बाथरुममध्ये शिरला.
– आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, “होय मीच हल्ला केला.” – आरोपीने स्पष्ट केलं की तो चोरीच्याच उद्देशाने सैफच्या घरात गेला होता. पण जेव्हा घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सैफवर हल्ला केला. – आरोपी खरं बोलतोय की खोटं हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करतील.

error: Content is protected !!