[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

फडणवीस संतापले- शिवसेनेची तालिबानशी तुलना


मुंबई/ नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले होते त्यावर भाजपा नेते चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी शिवसेनेची तुलना तालिबानी दहशतवाद्यांशी केली आहे
फडणवीस म्हणाले की हा प्रकार ज्यांनी कुणी केला असेल त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेच नाही ही अतिशय संकुचित मानसिकता असून एक प्रकारे बुरसटलेले तालिबानी विचार आहे.अशाप्रकारे वागणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही .बाळासाहेबांना ज्यांनी जेलमध्ये पाठवले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि कुणी श्रध्देने समाधीवर फुले वाहिली तर ती अपवित्र झाली म्हणता .हे अत्यंत चुकीचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!