ज्योती मल्होत्राचं नेटवर्क उध्वस्त करणार – भारतातील अनेक गद्दार रडारवर
नवी दिल्ली/पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतातील गद्दार युट्युब वर ज्योती मल्होत्रा हिचे अनेक साथीदार तपास यंत्रणांच्या रडावर वर असून त्यातील काहींना उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा आणि पंजाब मधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे तसेच ज्योतीचे भारतातील जे नेटवर्क आहे ते पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या तयारी तपास यंत्रणा आहेत
पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत राहणारी युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.
कोरोना काळात गुरुग्राममधून शेवटची नोकरी सोडून ज्योती मल्होत्रा हिसारला परतली आणि तिथूनच तिने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. यूट्यूब व्हिडिओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे येऊ लागल्यावर तिने हाच मार्ग पुढे चालण्याचा निर्णय घेतला. इथूनच तिच्या आयुष्यात वळण आलं. मोठ्या गाड्यांमध्ये फिरण्याची, उच्चभ्रू लोकांसोबत उठबस करण्याची, चंगळखोरी करण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम असावी ही इच्छा तिला देशविरोधी कारवायांच्या मार्गावर घेऊन गेली. हिसारमधील एफसी वुमन कॉलेजमधून तिने बीए पूर्ण केलं. ज्योती ही तिच्या आई-वडिलांची एकमेव मुलगी आहे.
