[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी चे खाजगीकरण नाही-परिवहन मंत्री

मुंबई/ एस टी चे सरकार खाजगीकरण करणार असल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार असून तूर्तास तरी असा सरकारचा कोणताही विचार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे
गेल्या काही दिवसांपासून जो एस टी च संप सुरू आहे त्यात आतापर्यंत एस टी चे १५० कोटींचे नुकसान झाले पण संप काही मिटत नाही कारण कर्मचारी विलिनीकरण मागणीवर ठाम आहेत पण आता विलीनीकरण काही होईल असे वाटत नाही उलट एस टी महामंडळ हा संप मोडून काढण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी ४३४३ कामगारांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे आता २२तारखेच्या न्यायालयीन सुनावणीत काय होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!