[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप – आयोगाने आरोप फेटाळले


नवी दिल्ली/ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मत चोरीचा आरोप केला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात ६८५० नवीन नवे घुसवण्यात आली तर कर्नाटकातील आळंद मतदार संघात ६०१८ नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप केला .त्यासाठी पुरावा म्हणून एका मतदारालाच पत्रकार परिषदेत हजर केले.त्यामुळे निवडणूक आयोगावरचा संशय वाढला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार केला जात आहे. अशातच आज राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आणखी एका मतदारसंघातील आकडेवारी देत खळबळजनक दावा केला आहे. आपल्या आरोपाला आधार म्हणून राहुल गांधी यांनी या मतदारसंघातील एका व्यक्तीलाही आपल्यासोबत पत्रकार परिषदेत आणले होते.देशातील लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या व्यक्तींना केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कसं पाठीशी घातलं, याचा पर्दाफाश मी करणार आहे. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि अत्यंत जबाबदारीने पुराव्यांनिशी मी बोलत आहे. निवडणुकांमध्ये ठरवून अनेकांची नावे मतदारयाद्यांमधून काढली जात आहेत, तर काही नाव ठरवून समाविष्ट केली जात आहे. नावे काढताना दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय समाजाला लक्ष्य केलं जात आहे. हे आधीही आढळून आलं होतं आणि आता हे सत्य असल्याचे आमच्याकडे १००० टक्के पुरावे आहेत. मी असा व्यक्ती आहे जो आपल्या देशावर प्रेम करतो, संविधानावर प्रेम करतो, लोकशाहीवर प्रेम करतो. त्यामुळे मी ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, त्याबाबतच इथं बोलणार आहे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांतून कशा प्रकारे काँग्रेस समर्थक लोकांची नावे डिलिट करण्यात आली, याबाबतचे आरोप केले आहेत.मतचोरीचा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, “कर्नाटकात आलंद नावाचा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कोणीतरी ६ हजार १८ मते डिलिट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चोर सापडला. या मतदारसंघात झालं असं की, बूथस्तरावर काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या काकांचे नाव मतदार यादीतून डिलिट करण्यात आले होते. त्यामुळे हे नाव कोणी डिलिट केले, याची माहिती सदर अधिकाऱ्याने काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हे नाव मतदार यादीतून डिलिट केल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अधिकाऱ्याने त्या शेजारच्या व्यक्तीकडे विचारपूस केली. परंतु मी असं काहीही केलं नसल्याचं शेजाऱ्याने सांगितलं. हे मत शेजाऱ्याने डिलिट केले नव्हते तर यासाठी एक वेगळी शक्ती काम करत होती,” असा दावा राहुल गांधींनी केला आहे.कर्नाटकातील आलंद मतदारसंघात ६ हजार १८ मते डिलिट करण्यासाठी विविध लोकांच्या नावे अर्ज करण्यात आला होता. परंतु ज्या लोकांच्या नावाने अर्ज करण्यात आला होता त्या लोकांनी प्रत्यक्षात असा अर्ज केलाच नव्हता. त्या लोकांच्या नावाचा वापर करून बाहेरच्या राज्यातून हे अर्ज करण्यात आले होते आणि जिथं काँग्रेसची ताकद आहे अशा बूथवरील मतदारांची नावे अत्यंत शिताफीने डिलिट करण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करून १२ मते डिलिट करण्यात आली. मात्र सूर्यकांत यांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती,” असं सांगत ज्या सूर्यकांत यांच्या नावाने ही नावे डिलिट करण्यात आली त्या सूर्यकांत यांना राहुल गांधींनी माध्यमांसमोर बोलावलं आणि त्यांनाच याबाबत अधिक माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर मी मते डिलिट करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता, असं सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने म्हटलं आहे
राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. “राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन पद्धतीने थेट मतदारांचे नाव हटवू शकत नाही, यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते. कुठल्याही व्यक्तीचे नाव हटवण्यापूर्वी त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. दरम्यान, २०२३ मध्ये अलांड मतदारसंघात अशा प्रकारचे काही अपयशी प्रयत्न झाले होते आणि या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्वतः एफआयआर नोंदवला होता”, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. पुढे आयोगाने सांगितले की, “२०१८ मध्ये आळंद मतदारसंघातून भाजपचे सुभद गुट्टेदार विजयी झाले होते. तर, २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील हे विजयी झाले.”

error: Content is protected !!