[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विद्येच्या मंदिरात अश्लीलतेचा खेळ चंडीगढ मध्ये एम एम एस कांड

चंडीगढ/ आजकाल समाजात आणि खास करून तरुण पिढीत अश्लीलतेचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे एक भयंकर उदाहरण समोर आहे.आणि तेही विद्येच्या पवित्र मंदिरात! चंडीगढ विद्यापीठातील मुलींच्या छत्रल्यातील बाथरूम मध्ये एका मुलीनेच छुपे कॅमेरे बसवून चित्रीकरण केले मात्र 60 मुलींच्या आंघोळी चां हा व्हिडिओ लीक होताच केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.
प्रसाधन गृह किंवा चेंजिंग रूम मध्ये कॅमेरे लावण्याचे प्रकार तसे नवे नाहीत पण चंडीगढ युनिव्हर्सिटी मध्ये घडलेला प्रकार भयानक आहे .कारण अशा गुन्ह्यातील आरोपी प्रामुख्याने पुरुष असतात पण हा गुन्हा एका तरुणींनी केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच चदिगड युनिव्हर्सिटी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शने केली दरम्यान या घटने नंतर काही मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .पण पोलिसांनी मात्र असे काही घडल नाही असे सांगितले तसेच या घटनेची पंजाब महिला आयोगाने गंभीर दखल घेऊन युनिव्हर्सिटी आणि पंजाब पोलिसांना नोटीस बजावली आहे.

error: Content is protected !!