ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या समावेशावरून वाद


नवी दिल्ली/भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तान कडून जो अपप्रचार सुरू आहे त्याची पोलपोळ करण्यासाठी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांची एक शिष्टमंडळ ,जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे .मात्र या शिष्टमंडळात शशी थरूर यांची परस्पर नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे. परिणामी विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच शिष्ट मंडळ वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा काँग्रेस या प्रमुख दोन मोठ्या पक्षांसह जे डी यु शिवसेना, तृणामूल काँग्रेस, आधी इतर पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे. मात्र शिष्टमंडळात समावेश करण्यासाठी काँग्रेसने जी चार नावे दिली होती, त्यापैकी केवळ आनंद शर्मा यांचे नाव सरकारने स्वीकारले. तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या विरोधात बोलणारे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी ठरून यांचा मात्र परस्पर समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे .शशी थरूर यांच्या नियुक्तीवरून आता काँग्रेस आणि भाजपा मध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तर काँग्रेसचा किती जरी दबाव असला तरी शशी थरूर हे शिष्टमंडळात राहतीलच असे भाजपा कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळाची ७ गटांमध्ये विभागीयात आली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनण्यात आले आहे. प्रत्येक गटात ८ ते ९, सदस्य आहेत. यामध्ये ६-७ खासदार, पेड नेते (माजी मंत्री) आणि राजदूतांचा समावेश आहे,
सर्व शिष्टमंडळांमध्ये किमान एका मुस्लिम प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. मग ती राजकारणी असो किंवा राजदूतः अमेरिकेसह ५ देशांमध्ये जाणान्या शिष्टमंडळाची कमान काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
गट १ चे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा, गट २ ची नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद, गट ३ चे नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा, गट ४ चे नेतृत्व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, गट ५ चे नेतृत्व शशी थरूर, गट ६ चे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोझी आणि गट ७ चे नेतृत्व राष्ट्रवादी-एससीपी खासदार सुप्रिया सुळे करत आहेत.
केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्टमध्ये लिहिले – एक ध्येय, एक संदेश, एक भारत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच प्रमुख देशांना भेटतील, जे दहशतवादाविरुद्धच्या आपल्या सामूहिक संकल्पाचे प्रतिबिंब आहे.

error: Content is protected !!