प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्यावर इंडी कडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली/काँग्रसेच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) वाड्रा यांच्या विरोधात हरियाणाच्या शिकोहपुरमध्ये जमीन खरेदी कराराशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.या प्रकरणात वाड्रा यांच्यासह या प्रकरणात अनेक लोक आणि कंपन्यांची नावे सामील आहेत.
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) वाड्रा यांच्या विरोधात हरिणायातील शिकोहपूर येथील जमीन खरेदी करारप्रकरणात मनी लॉड्रींग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. वाड्रा यांच्यासोबत या प्रकरणात अनेक लोक आणि कंपन्यांच्या नावांचा समावेश केला आहे. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ चे असून जेव्हा रॉबर्ट वाड्रा हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एक प्रॉपर्टी डीलर यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली होती. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार,फसवणूक बनावटपणा यांसह अन्य आरोप ठेवले आहेत.आरोपपत्रानुसार वाड्रा यांची कंपनी स्काईलाईट हॉस्पिटॅलिटीने २००८ मध्ये ७.५ कोटी रुपयांत ३.५३ एकरची जमीन खरेदी केली होती. तर योजना पूर्ण होण्याआधीच ही जमीन ५८ कोटींना विकली होती. आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांना आरोपी केले आहे. या प्रकरणात ईडीने वाड्रा यांची १८ तासांहून अधिक वेळ चौकशी केली. याच सोबत हरियाणाच्या अन्य काँग्रेस नेत्यांचीही चौकशी झाली आहे. आरोपपत्रात त्यांच्या जबाबाचा उल्लेख आहे.
