तहूवर रानाच्या चौकशीतून पाकिस्तानचा बुरखा फाटणार
नवी दिल्ली/मुंबईवरील 26 /1 i i1 च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तह-उर राणा सध्या एन आय ए च्या अटकेत आहे. आणि रोज एनआयए कडून त्याची आठ तास चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंतच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे मुद्दे उघडकीस आले आहेत. यामध्ये तह-उर राणाला मुंबई हल्ल्याची संपूर्ण माहिती होती त्यामुळे आता मुंबईमध्ये राणासाठी ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणाऱ्यांचा तसेच हेडलीला बनावट दस्तावेज पुरवणाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे तसेच राणाच्या चौकशीत समोर आलेले पुरावे पाकिस्तानला देऊन 26/ 11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा कसा हात होता हे सिद्ध केले जाणार आहे त्यामुळे पाकिस्तानचा पर्दाफाश होणार आहे
मुंबईवरील 26 /11 च्या हल्ल्याचे षडयंत्र पाकिस्तानात रचले गेले त्यासाठी लष्कर ए तोयबाचा अतिरेकी असलेल्या तह-उर राणा याला षडयंत्रात सामील करून घेऊन त्याच्या मार्फत हल्ल्याची आखणी करण्यात आली. राणाने डेव्हिड हेडली सारख्या दुसऱ्या दहशतवाद्याला हाताशी धरून संपूर्ण मुंबईची रेखी केली आणि त्यानंतरच मुंबईवरील 26/ 11 चा हल्ला करण्यात आला आता या हल्ल्यात डेव्हिड हेडलेल्या बोगस कागदपत्र पुरवण्याचे ज्यांनी ज्यांनी काम केले त्याचा शोध घेतला जाणार आहे
