संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग – या नव्या पुस्तकावरून वाद
।
मुंबई/शिवसेना नेते संजय राऊत यांच्या, आज प्रकाशित होणाऱ्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात, मोदी शहाणा शिवसेनाप्रमुख आणि शरद पवारानी वाचवले असा दावा करण्यात आला आहे. त्यावरून पुस्तकाच्या प्रकाश नापूर्वीच राजकीय वादळ उठले आहे.मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांनी या पुस्तकातील दाव्यावर कडाडून टीका केली आहे.त्यामुळे राऊतांचं नरकातील स्वर्ग वरून पृथ्वीवर राजकीय महाभारत सुरू झाले आहे.
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी २०२२ मध्ये संजय राऊत यांना अटक झाली होती. यावेळी अटकेत असताना त्यांनी नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात गुजरात दंगलीचा उल्लेख आहे.तसेच या दंगलीच्या वेळी केंद्रात यूपीए अर्थात काँग्रेस आघाडीचे सरकार होते.दरम्यान गुजरात दंगलीचा चौकशी सुरू असताना, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप होते. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी शहा यांना वाचवले. शरद पवार तेंव्हा केंद्रात मंत्री होते. ते म्हणाले निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना अटक करणे योग्य ठरणार नाही म्हणूनच मोदी शहा यांची अटक टळली. असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे .
दरम्यान भाजपा नेत्यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकातील या दाव्याची खिल्ली उडवली आहे.मी बाल साहित्य वाचत नाही कारण ते वाचण्याचे माझे वय नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. तर संजय राऊत हे काय त्यावेळी अमित शहांच्या टॅक्सी मागे धावत होते का? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.तर राऊत यांचे हे पुस्तक अपुरे आहे. कारण जेलमध्ये असताना त्यांनी उद्धव ठाकरेनं घातलेल्या शिव्यांचा यात उल्लेख नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पुस्तक लिहावे असे मंत्री नितेश राणे म्हणाले .तर संजय राऊत यांच्या पुस्तकाचे नाव गटारातला अर्क असे असायला हवे होते. असे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यामुळे रवितांचे हे पुस्तक चांगलेच वादग्रस्त ठरणार आहे. आज जावेद अख्तर,शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
