[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

उद्याच्या महामोर्चाची तयारी पूर्ण

मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व कामगार संघटना सामील होणार आहेत दरम्यान या महामोर्चाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही . मात्र हा महामोर्चा होणारच आणि तो यशस्वी करून दाखवा अशी सूचना महाविकस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांनी दिल्या आहेत . गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली . यात उद्वव ठाकरे आणि अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आणि मोर्चा होणारच असा निर्धार व्यक्त केला .

error: Content is protected !!