[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

नाविकांना हवी आयकरात सूट ; मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर ; केंद्र सरकार कडे भावना कळविण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना  २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व  नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी  नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व  सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सर्व खलाशी कामगारांच्या  वतींने मागण्यांचे निवेदन सादर केले.  नुसीच्या कुशल व कामगार कल्याणकारी योजना आणि  नुसीची १२५ वर्ष साजरी होणारी  वैभवशाली कार्यपरंपरा  राज्यपालांना आवडल्यामुळे त्यांनी दोन्ही मागण्या भारत सरकारकडे  पाठविण्याचे आश्वासन दिले.  यापुढे होणारी प्रगती नाविकांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!