[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

निवडणुकी निमित शाळांना २ दिवस सुट्टी


मुंबई – येत्या २० नोव्हेबारला महराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या कामासाठी काही शिक्षकांचीही नेमणूक करण्यात आल्याने १८ ते २० या तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तारीख २० मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी तारीख १८ आणि मंगळवारी ता. १९ शाळांना सरसकट सुट्टी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले. निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना पुढील आठवड्यात सोमवारी ते बुधवार दरम्यान सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय आवश्यकतेनुसार त्या-त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा, असा आदेश देणारे परिपत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी काढले हो
त्यानंतर शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अखेर शिक्षण आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण करणारे परिपत्रक शुक्रवारी काढावे लागले. शिक्षण विभागाने गुरुवारी परिपत्रक काढल्याने शाळांना सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९) सुट्टी जाहीर करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु ही कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
संदर्भात गुरुवारी दिलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिली आहे

error: Content is protected !!