[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

केंद्र सरकारच्या विरोधात चार राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर – जाळपोळ दगडफेक ट्रेन जाळली सरकारचा” अग्निपथ” पेटला


दिल्ली/ बहुमताच्या जोरावर चुकीचे नियम चुकीचे कायदे आणि चुकीचे योजना लोकांच्या गळी मारण्याचे मोदी सरकारचे उद्योग आता लोक खपवून घ्यायला तयार नाही म्हणूनच केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि सर्वत्र तोडफोड जाळपोळ करीत आहे
सरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेत तरुणांना लष्करात घेणार पण त्यातील 25 टक्के तरुणांना कायम करणार आणि 75 तरुणांना 4 वर्षानंतर घरी बसवणार अशी ही योजना आहे . मग ज्या 75 तरुणांना 4 वर्षांनंतर घरी बसवणार त्यांनी नंतर जायचे कुठे असा सवाल करीत देशभरातील तरुण रस्त्यावर उतरला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली बिहार ,युपी,राजस्थान झारखंड आदी राज्यात भयंकर हिंसाचार उसळला काही ठिकाणी रस्त्यावरची वाहने जाळली तर काही ठिकाणी ट्रेन जाळण्यात आल्या आता हे हिंसाचाराचे लोन सर्वत्र पसरले आहे त्यामुळे सरकार हादरले आहे सरकारचा हा अग्निपथ त्यांना चांगलाच तापदायक ठरणार आहे .

error: Content is protected !!