[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणीला पैसे मिळणार”

मुंबई/लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे अजिबात थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही दिली आहे कालच त्यांनी साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही केली त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्यांचा ठरलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीत परतुरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी प्रवेश केला त्यांच्यासोबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले
जालन्यात झालेल्या या पक्षाप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी सांगितले की आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही किंवा त्याला आमच्या पक्षात आल्याचा पश्चाताप होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ त्याच बरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील त्याने काळजी करू नये असेही अजित दादांनी सांगितले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार अत्यंत गंभीर असो शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही महायुती सरकारनेच शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत केलेली आहे असेही अजितदादा म्हणाले त्याचबरोबर एक रुपयात पीक विमा योजना ह्या अत्यंत चांगली योजना होती पण त्यात काही ठिकाणी गैरप्रकार झाले हे अत्यंत दुर्दैवी होते असा प्रकारांना सरकार खपवून घेणार नाही असेही ते म्हणाल्याचे समजते

error: Content is protected !!