मराठा आंदोलक आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार
धाराशिव / मराठ्यांना कुणबी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर आंदोलन करून सरकारकडून ती मागणी मान्य करून घेतल्यानंतर मनोज जरांगे आता शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभारणार आहेत. त्यासाठी दिवाळीनंतर बैठका घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने ३२ हजार कोटींचं पॅकेजही जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, काही मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी न भुतो न भविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकरी हा महत्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. त्यामुळे, अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला १५ दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आले जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील दिशा स्पष्ट केलीदरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत 2 सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन आदेश जारी केला. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातील कुणबींना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर बैठक घेणार आहेत. दिवाळीनंतर या बैठकांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गेल्या १०० वर्षात शेती प्रश्नावर उभारले नाही असे आंदोलन उभं करण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला, फडणवीसांचे कौतुक करत दिलेला शब्द पाळा ही विनंतीही जरांगे पाटील यांनी आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन केली आहे.
मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणनंतर शेती प्रश्नावर लढा उभारणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली. असं आंदोलन उभा करावं लागेल की इथून पुढे अन् इथून मागे १०० वर्षात अस आंदोलन कोणी केल नसेल, तेव्हाच शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करु घ्याव्या लागतील. मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल, नुसतं वावरात फिरल्याने, भाषण केल्याने, चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरुन निघणार नाही. शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल, कर्जमुक्ती करायची असेल, नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकतीने आंदोलन लावून धरावं लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असेही पाटील यांनी म्हटले.
