चिकन मटण बंदीच्या वादात मनसेची एन्ट्री
मुंबई /आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दीन आहे.त्यामुळे देशात स्वातंत्र्य दिनाचे भरगच्च कार्यक्रम आहेत.पण महाराष्ट्रात मात्र ५ महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी चिकन मटण विक्रीला बंदी केल्याने वाद निर्माण झाला आहे.या वादात आता मनसेनेही उडी घेतली असून, मटण चिकन विक्री बंदीला राज ठाकरेंनी विरोध केला आहे.कोणी काय खायचे हे सरकारने सांगू नये. असे म्हणत त्यांनी मटण बंदीच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
कोणी काय खावे आणि काय नाही याचे महापालिकेने ठरवू नये. स्वातंत्र्य दिनाला खाण्याचेही स्वातंत्र्य नाही का? एकीकडे स्वातंत्र्यदिन म्हणायचे अन् खाण्यावर बंदी आणायची. असा विरोधाभास कशासाठी? कोणाचे काय धर्म आहेत, कोणाचे काय सण आहेत, याप्रमाणे कोणी काय खावं? हे सरकारने सांगू नये,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
१५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी मटण चिकन विक्री करू नये असे कल्याण डोंबिवली,संभाजी नगर,अमरावती ,मालेगाव आदी ५ महापालिकेने आदेश काढले आहेत. त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना तसेच खाटिक समाज आणि इतर महापालिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.आणि मनसेही या निर्णयाच्या विरोधात उतरली आहे .स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार आहे कोणी काय खावे हे सरकारने सांगू नये असे राज ठाकरेंनी म्हटले आहे .त्यामुळे आजच्या सावतंत्र्य दिनावर मटण चिकन बंदीचे सावट आहे.या वादामुळे राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .दरम्यान कबूतर बंदीच्या विषयावर राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये सध्या कबुतर खान्याच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण रंगताना दिसत आहे. न्यायालयाचे आदेश धुडकावून जैन समाज कबुतर खान्यांवरील कारवाईविरोधात आक्रमक झाला आहे. कबुतरांच्या रक्षणासाठी प्रसंगी शस्त्र उचलू.. असा इशाराही जैन मुनिंनी दिला आहे. यावरुनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली असून कोणी आदेश मोडत असेल तर कारवाई करावी, असे म्हणत सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
हायकोर्टाच्या निर्णयाने सर्वांना वागावे लागेल. जैन मुनी यांनी याचा विचार केला पाहिजे. कबुतरामुळे काय काय रोग होतात हे डॉक्टरांनी सांगून पण खायला घातलं असतील तर कारवाई व्हायला हवी. एकाने सुरुवात केली तर बाकी लोक पण ते वागणार आहे. मग हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट कशाला हवे?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्य दिनी मटण चिकन विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला काँग्रेस,राष्ट्रवादी मनसे आणि इतर पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णया विरोध कल्याण मध्ये मटण पार्टीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे तर काँग्रेसने या निर्णयाला विरोध करण्यासाठी या दिवशी पालिकेत कोंबड्या सोडण्याचे ठरवले आहे.
