ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत


मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही टोलनाक्यावर गाड्यांना उभे राहावे लागते. त्यामुळे देशातील सर्व टोलनाके आता बंद करून नवीन यंत्रणा राबवण्याबाबत बाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलताना गडकरी म्हणाले टोल बाबत जास्त सांगणार नाही .पण पंधरा दिवसाच्या आत अशी पॉलिसी येईल की टोल बद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी केवळ महाराष्ट्रातील टोलबाबत बोलत नाही तर देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलबाबत बोलतोय ते पुढे म्हणाले आम्ही सॅटॅलाइट बेस फ्री टूलिंग सिस्टीम तयार करतोय .त्यामुळे टोल नाके राहणार नाही. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमचा नंबर प्लेट वरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल .मुंबई गोवा महामार्ग बद्दल बोलताना गडकरींना हसू आवरले नाही. ते म्हणाले या महामार्गाच्या निर्मितीत खूप अडचणी आल्या .पण काळजी करू नका या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण होईल असे गडकरी यांनी आश्वासन दिले आहे.

error: Content is protected !!