[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुढील मकरसंक्राती पर्यंत ठाकरे – फडणवीस एकत्र येणार – आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा


अमरावती – विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. शिवाय जो आक्रमकपणा होता तोही थोडासा मावळला आहे.त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा युती होणार, अशा चर्चा असातानाच ‘ पढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी सहभागी व्हावे, तिळगूळ खावे आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटलं आहे. युवा स्वाभिमान पक्षातर्फे रवी राणा यांच्या पुढाकाराने मंगळवारी मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले आहेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.

error: Content is protected !!