[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी

दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे

करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे की, आम्ही १८ जानेवारीला भूमिका स्पष्ट आहोत. आता यावर काहीच बोलणार नाही. आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका आम्ही मांडणार पण योग्य वेळी, असंही तांहे म्हणाले. काय घडामोडी होतात यापेक्षा निवडणूक महत्वाची आहे, असंही ते म्हणाले.

माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असं ट्वीट सुधीर तांबे यांनी केलं आहे.

error: Content is protected !!