[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा ३२८ दारू दुकानांना परवाना देण्याचा निर्णय


मुंबई/ लाडक्या बहिणींना दरमहा १५०० दिल्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे.ती भरण्यासाठी व लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा निधी उभारण्यासाठी, सरकारने दारूचा प्याला हातात घेतला आहे.यंदा ३२८ वाईन शॉपना सरकारने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या दारूमुळे माय भगिनींचे संसार उध्वस्त होतात त्याच दारूचा आसरा सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
गेली ५० वर्षे वाइन शॉप परवान्यांना राज्यात असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठवली जाणार असून, नव्याने ३२८ वाइन शॉपना परवाने दिले जाणार आहेत. महसूल वाढवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांना परवाना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीच समिती नेमण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वादाची ठिणगीही पडली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय व्यक्ती या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या पार्श्वभूमीवर, हितसंबंधाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वतःच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींना याचा फायदा मिळण्याची शक्यता असल्यामुळे काही सामाजिक संघटनांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान या निर्णयवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला आहे.
लाडक्या बहिणींचा संसार उध्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. १९७४ मध्ये या राज्यात मद्यविक्रीचे परवाने रद्द केले होते. सत्तेची मस्तीमुळे मद्यधुंदाासाठी सरकारने परवाने उघड करायचे ठरवले आहे. अर्थव्यवस्थेचा खेळ खंडोबा होतोय. बहिणींचे पैसे द्यायचे आणि त्यांच्या नवऱ्यांना, बाबांना बेवडं आणि दारुडा करायचं, आठ विभाग आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे हे परवाने आखले जाणार. एकेक कोटीला हे परवाने मिळणार. आत्ताच एका माजी मंत्राने परवानगी घेतला. महाराष्ट्रामध्ये जुनी दुकानांमध्ये दहा ते पंधरा कोटीने त्याशिवाय परवाने मिळत नव्हते. त्या कंपन्यांना परवाने देण्याचा म्हणतात, त्या कोणाच्या मालकीच्या आहेत. हे सर्व मालक पहिलं मजल्यापासून वरपर्यंत बसले, त्यांचीच मुले ह्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. या कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. तुम्ही धंदा करा, तुम्ही धंद्यातून पैसा कमवा, तुम्हाला सत्तेची झिंग आहे, बहिणीला पैसे द्यायला नाहीत, कारण देऊन आर्थिक स्थिती सुधारायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उध्वस्त करणार असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
चौकट
आज बार बंद
एकीकडे सरकारने दारू व्यवसायाला चालना देण्यासाठी ३२८ नवे दारू परवाने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे .तर दुसरीकडे व्हॅट दुप्पट केल्याने तसेच परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केल्याने इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात “आहार” या संघटनेने एक दिवसाचा बंद पुकारला आहे .त्यामुळे आज १४ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व बार बंद रहातील.

error: Content is protected !!