ठाकरे बंधूंचे एकी झाल्यास महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता
पुणे/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.काँग्रेसचा एक गट या युतीबाबत सकारात्मक आहे तर दुसरा गट मात्र विरोधात आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच आहे मात्र राज ठाकरेना माविआ मध्ये घेण्याबाबत आघाडीच्या नेत्याशी चर्चाकरावी लागेल असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले.
ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार का ? या एकाच गोष्टीची महाराष्ट्राला उत्सुकता आहे .मात्र या बाबत उद्धव किंवा राज दोघांनीही स्पष्ट असे काहीही सांगितलेले नाही.पण उद्धव ठाकरेंचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक असल्याने उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार ,राज सोबत युती करून निवडणूक लढवणार की माविआ मधेच रहाणार याची उत्सुकता आहे.मात्र आमचे आम्ही बघून घेऊ अशी उत्तरे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून येत आहेत.तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीवरून काँग्रेस मध्ये मतभेद सुरू झालेत.विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.तर काँग्रेसच्या काही नेत्यांना मात्र उद्धव ठाकरे आणि शक्य असल्यास राज ठाकरेना सुधा माविआट घ्यावे असे वाटत आहे.
– “दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. मात्र, युतीबाबत अंतिम निर्णय चर्चेतून घेतला जाईल.” याशिवाय, त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही भाष्य केले आणि आघाडीच्या भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष विचारमंथन करत असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
