[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

१४० कोटी भारतीयांनी लघवी केली तरी पाकिस्तानात सुनामी येईल – अभिनेता मिथुन चक्रवर्तीच पाकिस्तानी लष्करप्रमुखांना सडेतोड उत्तर


कोलकाता /भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली होती. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असं झरदारी यांनी म्हटलं आहे. यावर आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
सिंधू नदीच्या पाण्यावरून बिलावल भुट्टो यांनी भारताला धमकी दिली होती. यावर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले की, ‘पाकिस्तानच्या लोकांबद्दल आम्हाला समस्या नाही. पाकिस्तानचे लोक चांगले लोक आहेत. पण जर त्यांचे नेते असेच अर्वाच्च बोलत राहिले तर आमची खोपडी सटकेल आणि मग एका मागून एक ब्रह्मोसचा वापर केला जाईल. मात्र असे काहीही झाले नाही तर आपण एक धरण बांधू आणि १४० कोटी लोक त्यात लघवी करतील. गोळीबार होणार नाही, मात्र लघवीमुळे पाकिस्तानात त्सुनामी येईल. उरूसाच्या कार्यक्रमात भुट्टो यांनी भारताला ही धमकी दिली होती. दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतलेली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानातील शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकी दिली जात आहे.

error: Content is protected !!