[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बोगस लॅबना राज्यकर्त्यांचा आश्रय-चुकीच्या निधनामुळे रुग्णांच्या जीवाला धोका

सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!