राहुल गांधी प्रमाणेच लालूच्या मुलाचाही पराभव होईल – प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान ६ नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान ११ नोव्हेंबरला होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष पहिल्यांदा रिंगणात आहे. तेजस्वी यादव यांच्या राघोपूर विधानसभा मतदारसंघात पोहोचले आहेत. प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांना इशारा दिला आहे. राघोपूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवल्यास राहुल गांधींचं जे अमेठीत झालं होतं तेच तेजस्वी यादव याचं या मतदारसंघात होईल, असं प्रशांत किशोर म्हणाले.
जर मी राघोपूरमधून लढलो तर तेजस्वी यादव यांना राहुल गांधी यांना अमेठीत ज्या स्थितीला सामोरं जावं लागले त्याच स्थितीला सामोरं जावं लागेल, असं प्रशांत किशोर म्हणाले. तेजस्वी यादव यांना राघोपूरच्या लोकांनी मतदान केलं. त्यांच्या पालकांना मुख्यमंत्री केलं, तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री केलं. मात्र, ते लोक सध्या संकटात आहेत, तेजस्वी यादव यांना त्यांची काळजी नाही.
तेजस्वी यादव विधानसभेला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी प्रसांत किशोर देखील तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, त्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांचं हे वक्तव्य समोर आलं