[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल- शिवसेनेचे शिंदे गटाला जशास तसे उत्तर


मुंबई/ गणेश विसर्जनाच्या वेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जी राडेबाजी झाली त्यात शिवसेनेने शिंदे गटाला जशास तसे उत्तर दिले आहे . त्यामुळेच गोळीबार केल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला तर शिवसैनिकांवर दाखल केलेले चोरीचे गुन्हे मागे घ्यावे लागले
दादर मध्ये विसर्जनाच्या दिवशी शिवसेना गटाच्या गणेशोत्सव मंडळाची आणि शिंदे गटाच्या गणपती मंडळाची मिरवणूक समोरासमोर आली यावेळी सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी म्याव म्यव असा आवाज काढला त्यावरून दोन्ही गटात सुरुवातील घोषणाबाजी आणि नंतर हाणामारी झाली नंतर पोलिसानं8 हे प्रकरण मिटवले.पण या प्रकरणी शिंदे गटाच्या तक्रारीवरून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर शनिवारी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला तसेच या प्रकरणी सरवणकर यांच्यावर गुन्हे दखल करा अशी मागणी करीत दादर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले त्यानुसार शिवसेनेची मागणी मान्य करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिले होते . अखेर आज शिवसैनिकांवर दाखल केलेले चोरीचे गुन्हे मागे घेतले तर सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान कोळी बांधवांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल माजी उप महापौर हेमांगी वरळीकर नी समाधान सरवणकर यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे .त्यामुळे ही राडेबाजी आता लवकर थांबेल असे वाटत नाही

error: Content is protected !!