[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपची महाविकस आघाडीवर मात- धनंजय महाडिक विजयी


मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा अखेर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी जिंकली सताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे .
राज्यसभा निवडणूक सायंकाळी 4 वाजता संपली पण निकाल मात्र मध्यरात्री लागला आणि भाजप उमेदवार विजयी झाला बहुजन विकास आघाडीची तीन आणि आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आणखी काही अपक्षांची मते फुटल्याने भाजपचा विजय झाला . पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळूनही शिवसेना उमेदवार संजय पावर पराभूत झाले या निवडणुकीत काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी प्रफुल पटेल,शिवसेनेचे संजय राऊत तर भाजपचे पियूष गोयल ,अनिल बोंडे आणि धनजय महाडिक विजयी झाले

error: Content is protected !!