[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीची भर रस्त्यात निर्गुण हत्या


पुणे/मुंबई ठाणे नवी मुंबई डोंबिवली पाठोपाठ आता पुणेही गुन्हेगारीची राजधानी बनलेली आहे पुण्यात आता महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आज भर रस्त्यात एका तरुणाने आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर शेकडो लोकांच्या समक्ष कुणी हल्ला केला या त्या तरुणीचा मृत्यू झाला त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली
पुण्याच्या विमान नगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध आयटी कंपनीत शुभदा कोदारी नावाची तरुणी कामाला होती त्याच कंपनीत तिच्यासोबत कृष्णा सत्यनारायण कनोजा हा तरुण सुद्धा काम करायचा दरम्यान शुभराणे वडिलांच्या आजारासाठी कृष्णा कडून चार लाख रुपये उसने घेतले होते यातील एक लाख वीस हजार तिने परत केले परंतु उरलेले पैसे ती देऊ शकले नाहीत त्यामुळे कृष्णाने तिच्या मागे पैसे देण्यासाठी टगायला लावला होता परंतु ती पैसे देत नव्हती त्यानंतर कृष्णाने कंपनी जवळच भर रस्त्यात तिला अडवले आणि माझे पैसे कधी देणार असे विचारले परंतु ती माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणतात त्याने तिच्यावर सपास चाकूचे वार केले यात शुभदा जागीच मृत्युमुखी पडली दरम्यान हा सगळा प्रकार भर रस्त्यात शेकडो लोकांनी पाहिला पण कुणाचेही पुढे येण्याची हिंमत झाली नाही कारण त्याच्या हातात मोठा सुरा होता त्यामुळे लोक घाबरत होते अखेर त्याने सुरा फेकून देताच लोकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे

error: Content is protected !!