[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी होणार ?


नवी दिल्ली/विरोधी पक्षाने मत चोरीच्या विरुद्ध आंदोलन छेडले आहे.तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोग पालिका निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची फेरतपासणी करणार असल्याचे समजते.
केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद घेतली आहे. या परिषदेत देशभरातील मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी आयोगाकडून आढावा घेण्यात आला.
विशेष म्हणजे बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. तरीही केंद्र सरकारकडून देशभरात मतदार याद्यांची फेरतपासणी करण्यात येत आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची परिषद घेतली. यामध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी करण्यासाठी कुठपर्यंत तयारी झाली. तसेच प्रत्यक्ष विशेष मतदारयादी परिक्षण कधी राबवलं जाऊ शकतं, याकेंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या घेतलेल्या या परिषदेत काही महत्त्वाच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत.१२०० पेक्षा जास्त मतदार एका मतदार केंद्रावर नसतील याची काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात नवे मतदार पोलिंग स्टेशन तयार होऊ शकतात. तसेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांधी मतदार याद्यांची फेरतपासणी केली जाऊ शकते, असे संकेत मिळताना दिसत आहेत.

error: Content is protected !!