ठाकरे बंधूंची पुन्हा भेटशिवसेना मनसे युतीबाबत तब्बल ३ तास चर्चा?
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज ठाकरे बंधूंची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट झाली.या भेटीत राज व उद्धव यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती असे जरी सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र या भेटीत शिवसेना मनसेच्या युतीवर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या दोन ऑक्टोबर च्या दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे.
प्रार्थमिक शालेय शिक्षणात हिंदीच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू राज्यातील मराठी माणसांसाठी आशेचा किरण बनलेले आहेत त्यामुळे त्या दोन्ही भावांच्या भेटीगाठी कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. ठाकरेंच्या विरोधानंतर हिंदीच्या सक्तीचा जीआर महाराष्ट्र सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला होता या मेळाव्यात प्रथमच राज आणि उद्धव एका व्यासपीठावर आले होते . तेव्हापासूनच ठाकरे बंधूंमधील दुरावा हळूहळू कमी होत गेला आणि दोघेही एकत्र येण्याचे संकेत मिळू लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी तमाम मराठी माणसांची इच्छा आहे त्या दृष्टीने दोन्हीकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थया निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत हे दोन शिवसेना नेते होते तर राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर होते यावेळी राज आणि उद्धव मध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती राज ठाकरेंच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भेटायला बोलावले होते त्यामुळे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आले होते असे राऊत म्हणाले.matr प्रत्यक्षात या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे खास करून मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांबाबत चर्चा झाल्याचे समजते.त्यामुळेच राज ठाकरे यांनी ११ सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीत शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा करतील मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन पक्षात आगामी निवडणुकीसाठी युती होणार हे जवळपास नक्की झाले आहे आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर राज ठाकरे दिसणार का याबाबत महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान या भेटीत भव्य बाबतही चर्चा झाल्याचे कळते मनसे बरोबर युती झाल्यास उद्धव ठाकरे बवियातून बाहेर पडण्याची शक्यता आहे तसे झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे समीकरण तयार होईल आणि त्याचे कडवे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी समोर असेल.दरम्यान राज उद्धव यांच्या भेटीबाबत महायुतीच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे सावध प्रतिक्रिया देत दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंद आहे. मात्र त्यांच्या एकत्र जाण्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असे सांगितले.
ठाकरे बंधूंच्या एकत्रित बैठका होत असल्या तरी दोन्ही नेत्यांकडून अध्याप आपण राजकारणात एकत्र येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यात याबाबत घोषणा केली जाते का? हेच महत्वाचे ठरणार आहे.परंतु तशी शक्यता असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसांची एकगठ्ठा मते या दोन्ही भावांच्या युतीला जावू नयेत यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.शिंदेंनी तर महापालिका निवडणुकीसाठी २१ सदस्यांची समिती जाहीर केली आहे.भाजपाच्या गोटातूनही जोरदार हालचाली सुरू आहेत.महायुती मधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील असे जरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले असले तरी त्याबाबत अजूनतरी सकारात्मक बोलणी झाल्याचे दिसत नाही.मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला २६ अटींसह सशर्त परवानगी
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर होणार असून या मेळाव्या साठी महापालिकेने २६ अटींसह परवानगी दिली आहे.मात्र यातील अनेक अटी अत्यंत जाचक आहेत.एक अट तर अशी आहे की मेळाव्या दिवशी सरकारी कार्यक्रम आयोजित केला गेल्यास मेळाव्याची परवानगी रद्द होऊ शकते.तसेच रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी असेल.ध्वनिक्षेपक आणि इतरही जाचक अटी आहेत.त्यामुळे या अटीबाबत शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
