[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कुर्ला येथे कंत्रादारांवर गोळीबार


मुंबई/ आजकाल व्यावसायिक वादातून हल्ले होण्याचे प्रकार मुंबईत वाढत चालले आहेत कुरल्यात अशाच एका घटनेत कामाचे टेंडर मागे घ्यावे यावरून एका कंत्राट दारावर दोन इस्मानी गोळीबार केला यात सुदैवाने तो बचावला असून या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दहिसर येथे राहणारे सूरज प्रताप सिंग देवडा हे कंत्राटदार आहेत आणि त्यांची धरम कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे त्यांनी बांद्रा ते दहिसर दरम्यानच्या फूटपाथ नाले आदीच्या कामांचे 45 कोटींचे टेंडर भरले होते हे टेंडर मागे घ्यावे यासाठी त्यांना धमकवण्यात येत होते पण त्यांनी या धमकीला दाद दिली नाही त्यातच टेंडर 2 महिने पडून होते त्यामुळे देवडा यांनी म्हाडाच्या अभियंत्याला फोन करून टेंडर लवकर ओपन करा नाहीतर मी तुमची तक्रार करीन असा इशारा दिला होता याच दरम्यान देवडा यांना धमक्यांचे सत्र सुरू होते 9 जानेवारीला ते त्यांचा मित्र पंकज याच्या सोबत कारणे घरी जात असताना कुर्ला येथल कपाडिया गेट समोर रात्री 10 च्या दरम्यान मोटार सायकल वरून आलेल्या दोन गुंडांनी कार अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला त्यांनी प्रसंगावधान राखून कार वेगाने सुरू केली तरी त्यांचा पाठलाग करण्यात आला सुदैवाने ते बचावले या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात देवडा यांच्या फिर्यादीवरून कलम 307,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा हल्ला गणेश आणि समीर यांच्या इशाऱ्या वरून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्याचे अधिकारी कुलदीप व्हटकर अधिक तपास करीत आहेत

error: Content is protected !!